शिवसेना-भाजप युतीचा वाद मिटवण्यासाठी जानकर करणार मध्यस्थी

महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘शिवसेना आणि भाजपच्या युतीचा वाद सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन, हा वाद मिटवण्यासाठी मी प्रयत्न करेन’, असे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हंटल आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हंडोग्री गावात सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या भगवंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ या गोशाळेच्या पाहणी करण्यासाठी जानकर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.आमचा पक्ष छोटा असून शिवसेना-भाजप एकत्र आले तर फायदाच होईल, असा विश्वासही जानकरांनी यावेळी व्यक्त केला.

Loading...

एकीकडे दिवसेंदिवस शिवसेना-भाजप युतीचा वाद वाढत जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाने त्यात अधिक भर पडली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपच्या युतीची शक्यता धूसर वाटत असताना देखील जानकर मात्र त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलत आहे. त्यामुळे जाणकरांच्या प्रयत्नांना कितीपत यश प्राप्त होईल हे आगामी काळात स्पष्ट होईल.

युतीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

ही भाजपची निवडणुकीपूर्वीची शेवटची बैठक आहे. यानंतरची बैठक थेट लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच होईल. आम्हाला देशाच्या कल्याणासाठी युती करायची आहे. मात्र, त्यासाठी भाजप लाचारी पत्कारणार नाही. ज्यांना हिंदुत्त्ववाद हवा आहे, ते आमच्यासोबत येतील. ज्यांना हिंदुत्त्व नको असेल ते दूर जातील. जे सोबत असतील त्यांच्या साथीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. आता विजय हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे.

युतीबाबत काय म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत ?

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार. युती संदर्भात भाजपने प्रस्ताव मांडल्याच्या केवळ अफवा आहेत, असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसेच हा मोठा भाऊच दिल्लीचे तख्त गदागदा हलवणार आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...