महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?

महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?

mahebub shekh

पुणे – राज्यात कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे.

शेख हे ज्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी तर होतेच मात्र कोरोना बाबतचे कोणतेही नियम त्या ठिकाणी पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. महेबूब शेख हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष तर महेबूब शेख हे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची जयंत पाटील यांना कल्पना नव्हती असे होणार नाही. विशेष म्हणजे गर्दी होतील असे कार्यक्रम राष्ट्रवादीकडून आयोजित केले जाणार नाहीत असं पक्षाने जाहीर केलेले असतानाही शेख हे जंगी कार्यक्रम करत फिरत आहेत. त्यामुळे हे सर्व जयंत पाटील यांच्याच संमतीने आणि आशीर्वादानेच सुरु आहे का असा सवाल उपस्थित केला तर काही वावगे ठरणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेला कोरोनाचे नियम पाळा असे वारंवार आवाहन करत आहेत. गर्दी होऊ नये यासाठी सणवारांवर अनेक निर्बंध लादण्यात आले असून राज्यातील मंदिरे बंद असल्याने भाविकांचा आणि विरोधकांचा रोष देखील ते सहन करताना दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांचे निकटवर्तीय महेबूब शेख हे मात्र रोज वेगवेगळ्या गर्दी होतेय अशा कार्यक्रमांना हजेरी लावत अजित पवार यांचे आवाहन धुडकावत आहेत.

राज्यात तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत. यामुळेच राज्य कोरोनाच्या सावटाखाली असताना अशी गर्दी जमवणे योग्य आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या