‘वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव मे बिकता तेल’; महेबूब शेख यांची मोदी सरकारवर सडकून टीका 

maheboob shekh

मुंबई – केंद्राने वाढवलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज राज्यातील ४९ ठिकाणी आंदोलन करुन काल निषेध व्यक्त करण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील नाशिक, सोलापूर, लातूर, पंढरपूर, अहमदनगर, धुळे, हिंगोली, कळंब, शिर्डी, औरंगाबाद, चंद्रपूर, पनवेल, नागपूर, पिंपरी-चिंचवड, मिरा-भाईंदर, वसई, विरार, जळगाव, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, सांगली, कोल्हापूर, कल्याण, डोंबिवली, अकोला, उल्हासनगर, राहता, राहुरी, आकोले, वर्धा, गोंदिया, परभणी, वाशिम, सिंधुदु्र्ग, कोपरगाव, पेठवडगाव, सावर्डे आदींसह इतर ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे , शहरअध्यक्ष संजोग वाघीरे , प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ , अभिषेक बोके, मयुर गायकवाड , प्रदेश सरचिटणीस विशाल काळेभोर,अजय ओटे, लाला चिंचवडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप उपस्थितीत होते. या आंदोलनाचे आयोजन पिंपरी – चिंचवड अध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे अध्यक्ष महेश हांडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केले होते.

खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार रोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करीत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जागतिक महामारीमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. नुकतीच अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणा-या नागरीकांचा उद्योग, व्यवसाय सुरु झाला आहे. त्यात रोजच होणा-या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले जात आहे अशी टिका महेबूब शेख यांनी केली. ‘वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव मे बिकता तेल’ अशा घोषणा देऊन युवक आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

महत्वाच्या बातम्या