fbpx

पुणे जिल्ह्यातील चारही जागा महायुती जिंकेल:- डॉ अर्चना पाटील

टीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांनी दमदार प्रचार केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आमचा उमेदवार हा हमखास निवडून येणारचं असा विश्वास व्यक्त करत आहेत. असाच विश्वास भाजप नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी पुण्यातील उमेदवारांच्या बाबतीत केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती,मावळ, पुणे, शिरूर या जागा भाजप-शिवसेना-रासप-आर पी आय महायुती नक्कीच जिंकेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे येथे पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की, भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रचार सभांना मतदारांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असून पुण्याचे गिरीश बापट, बारामतीच्या कांचन कुल, मावळचे श्रीरंग बारणे, तर शिरूरचे शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या चारही जागा निश्चितचं भाजप आणि मित्र पक्ष जिंकणार आहे.

तसेच राज्यात आणि केंद्रात भाजप व मित्र पक्षाचे सरकार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकार विकासाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावत असून अनेक योजनां लाभ देखील जनसामान्यांना मिळवून देत आहेत. त्यामुळे जनता निश्चितचं भाजप आणि मित्र पक्षाला सत्ता देणार आहे. असे देखील डॉ. पाटील यावेळी म्हणाल्या.