महावितरणच्या अधिकाऱ्याने वापरला ग्राहकांडून पैसे उकळण्याचा अजब फंडा !

फुलंब्री / परमेश्वर काळे: फुलंब्री तालुक्यातील महावितरण कंपनीच्या उपअभियंता वारेगाव येथील एका महिला अधिकाऱ्यांनी गणोरी (ता. फुलंब्री ) येथील गावात येऊन सुरळीत चालू असलेले मीटर कडून नेले आणि विधुत ग्राहकांना नाहक त्रास देत अरेरावी करत परस्पर पैसे द्या अन्यथा वाढीव बिल आकारू असा दम दिल्याची   खळबळ जनक घटना घडली असून संबंधित महिला अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भाऊसाहेब उबाळे सह अन्य ग्राहकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महावितरण यांच्याकडे शुक्रवार (दि. 15) रोजी निवेदन देऊन केली आहे .

निवेदनात म्हटले आहे की ,आम्ही विधुत ग्राहक घरी नसल्याचा फायदा महावीतरणाच्या वारेगाव येथील एका महिला उपअभियंता घेतला आहे . त्यांनी तालुक्यातील गणोरी गावात बुधवार (दि.13) रोजी अचानक येऊन सर्व काही सुरळीत चालू असलेले मीटर काढून नेले, संबंधितांना त्वरित तीन हजार रुपयांची व्यवस्था करा अन्यथा पुढील काळात तुम्हाला दहा हजार रुपयांच्या वरती बिल आकारण्यात येईल अशी धमकी येथील ग्राहकांना या महिला अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, येथील नागरिकांनी त्यांना विचारले की, आमच्या मीटर मध्ये आम्ही काय फेरफार केला हे आमच्या निर्देशनात आणून द्यावं अशी मागणी त्यांना केली, असता त्यांनी येथिल ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरत चांगलाच दम दिला असल्याची तक्रार येथील ग्राहकांनी केली आहे .

तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की , येथील अधिकारी महिला असल्याने गोर गरीब शेतकऱ्यांना सतत अरेरावीची भाषा वापरते सतत कुठल्याही कारणावरून वैयक्तिक पैसे मागितले जाते त्यात त्यांच्या सहकार्यांच्या मदतीचा त्या वापर करत असतात त्यामुळे त्यांचा ब्लॉकमेलिंग करून पैसे उकळण्याच्या व्यवसाय त्यांनी तेजीत सुरू केला आहे . शिवाय येथील सर्व्हिस वायर आणि मीटर काढतांना कुठल्याही प्रकारे पांचनामा केला जात नाही आपल्या मार्जितल्या व्यक्तीचे मीटर काढून तीन हजार रुपयाची मागणी केली जाते तसे नाही झाल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार शिवाय तुरुंगात दाबणार असल्याचा दम देखील त्या देत असल्याचे येथील नागरिक सांगितले आहे त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दहशत निर्माण झाली आहे .

या बाबत विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया

माझ्या मीटरमध्ये कुठलेही फॉल्ट नसताना माझे सर्व्हिस वायर, मीटर काढून नेले आहे . शिवाय तीन हजार रुपयांची मागणी वारेगाव येथील उपअभियंता श्री ढाके मॅडम यांनी केली आहे , नसता मोठा दंड वसूल करू असे त्यांनी मला सांगितले आहे , शिवाय त्यांना मीटर मध्ये कुठलाही फेरफार केलेला नाही तसे असल्यास तुम्ही ते माझ्या निर्देशनात आणून द्याव अशी विनंती मी त्यांना केली परंतु त्या अरेरावीची भाषा वापरत सक्तिने तुमच्याकडून पैसे वसूल करू असे सांगत असल्याने परिसरात त्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे .

– गजानन भादवे,विधुत ग्राहक गणोरी

You might also like
Comments
Loading...