उदगीर नगरपरिषेदेकडे महावितरणची तब्बल 25 कोटींची थकबाकी…

mahavitran

प्रतिनिधी/ उदगीर-उदगीर येथील नगरपरिषदेला अ वर्ग दर्जा असून शहराचा विस्तार हि मोठा आहे. एक लाखांच्या वर शहराची लोकसंख्या आहे. शहर पाणीपुरवठ्याच्या विविध योजना, पथदिवे, अशी एकून महावितरणच्या वीज बिलपोटी मागच्या अनेक वर्षा पासून थकलेली थकबाकी 25 कोटीच्या रुपयाच्या वर आहे. महावितरणकडून वीज बिल भरण्यासाठी 100 हप्ते पाडून देण्यात आलेत.मात्र नगरपरिषदेकडून वीज बिल भरण्यास टाळाटाळ होत असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी सांगितले.

शहरात 183 च्या वर वीज जोडण्या आहेत . पाणीपुरवठ्याची थकबाकी 5 कोटी 1 हजार रुपये, शहरातील पथदिव्याची थकबाकी 8 कोटी 27 लक्ष 92 हजार रुपये, तर बनशेलकी येथील पाणीपुरवठा योजनेची 9 कोटी 34 लक्ष रुपये,भोपाणी साठवण तलावातुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची 2 कोटी 44 लाख रुपये आणि देवर्जन तलावातून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची 40 लाख अशी एकून 25 कोटी 45 लक्ष 93 हजार रुपये इतकी महावितरणचे थकबाकी नागरपरिषदेकडे रखडलेली आहे . मात्र 4-5 वर्षापासून चालू बिल भरण्यात येत आहे मात्र मागच्या काळातील थकबाकी भरण्यास टाळाटाळ होत असल्यान दरमहा नोटीस हि बाजावणव्यात आल असल्याची माहिती अभियंता आनंद काटकर यांनी दिली.