महावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच

मुंबई : राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी यासाठी महावितरणने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही.

महावितरणचे मोबाईल ॲप व संकेतस्थळ www.mahadiscom.in  याद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाईन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना

You might also like
Comments
Loading...