छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली १६ जूनला महाविशाल मोर्चा, मराठा समाजाने सहभागी होण्याचे आवाहन!

जालना : राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मराठा समाजाच्या मुख्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा यासाठी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज १६ जूनला कोल्हापुरात लाखोंच्या संख्येने एकवटत आहे. जालना जिल्ह्यात सकल मराठा समाजाने या महाविशाल निर्णायक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून  साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सध्या राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून शांततेत लढा देणाऱ्या  साष्टपिंपळगाव  ग्रामस्थ सध्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात सामिल झालेले पाहायला मिळत आहेत.

१६ जून रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर नगरीत सरकारला जागे करण्यासाठी महाविशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत राज्यभर असे मोर्चे जिल्ह्या जिल्हयात सुरूच राहणार आहेत. कोरोनाला न घाबरता घराघरातून मराठा तरुण या मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP