‘महाविकास आघाडी सरकारकडून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका’

vinod tawade maharashtra desha

टीम महाराष्ट्र देशा – मागील सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना हा मोठा दणका असल्याचे मानण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. या निर्णयावरून शिक्षणतज्ञांमध्ये वेगवेगळी मते होती परंतु आता राज्य सरकारने या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणले आहे.

या बाबतीत असही सांगण्यात येतंय कि, कारण सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे सरकारचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याकरिता संलग्नता देणे योग्य आहे का, असा आक्षेप घेण्यात आला.

कोणत्याही नवीन अभ्यासक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे, पण तसे करण्यात आले नाही. राज्याची दोन परीक्षा मंडळे असू नयेत असे शालेय शिक्षण विभागाचे मत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सर्व शाळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करण्याचे ठरले.

हेही पहा –