महाआघाडीचे हे सरकार ‘पाच वर्ष’ तर स्थिर आहेच, ‘पुढील सरकार’ देखील महाआघाडीचेच

टीम महाराष्ट्र देशा – महाविकास आघाडी सरकार बद्दल विरोधकांच्या मनात शंका आहेत. पण हे सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष आपला कार्यकाळ तर पूर्णकरेलच शिवाय पुढील काळात देखील महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात असेल. जनतेला समान किमान कार्यक्रम देणे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करणे यावरच सरकारचा भर असेल असे राज्याचे  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत.

ते लातूर येथे बोलत होते. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते, व्यापारी विविध संघटनाकडून मंगळवारी (ता. १८) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापारी अमर पवार यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख यांनी आडते, व्यापारी, विविध संघटना सोबत चर्चा केली.

Loading...

किमान समान कार्यक्रम घेऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. हे आघाडी सरकार भक्कम असून पाच वर्ष तर स्थिर आहेच, त्यापुढे देखील राहील असे म्हणत विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल शंका बाळगू नये, असा सल्लाही अमित देशमुख यांनी विरोधकांना दिला आहे.

निवडणूक निकालानंतर असं काही वेगळं होईल असे वाटले नव्हते पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नुसते सरकार स्थापन झाले नाही तर लातूरला मंत्रीपद देऊन श्रीमती सोनिया गांधी यांनी लातूरकरांचा सन्मानकेला. यासाठी आपली साथ मिळाली याचं करावं तेवढं कौतूक कमी आहे. आपली साथ यापुढे देखील अशीच राहावी असे ते म्हणाले.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं