लोकसभा आणि विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढणार; पवारांच मोठं विधान

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. दरम्यान, हे सरकार फार काळ टिकणार नाही, आपल्या ओझ्यानेच कोसळेल असं भाकीत भाजप नेत्यांनी केलं.

मात्र, या सरकारने दीड वर्ष पूर्ण केलं असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास आघाडीतील नेते व्यक्त करत आहेत. तर, आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था/महापालिकांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला असून तशी तयारी देखील सुरु केली आहे. तर, काँग्रेसने पुढील विधानसभा स्वबळावर लढून सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच, या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस अनेकदा समोर आले आहेत. सरकारच्या कारभारावर देखील आघाडीतील काही नेते नाराज आहेत.

अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ते राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.’हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP