महाविकास आघाडी सरकारने केली मराठा समाजाची दिशाभूल! प्रवीण दरेकरांचा आरोप

Praveen darekar vs uddhav thakrey

पुणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी गृहनिर्माणाच्या पुनर्विकास योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना आता मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकारकडून बैठका घेत काही निर्णयांची घोषणा केली जात आहे. या घोषणा म्हणजे मराठा समाजाच्या दिशाभूल केल्याचे आरोप प्रवीण दरेकरांनी लावले आहेत.

“आर्थिक मागास वर्गात मराठा समाजाचा आधीच समावेश होणार होता. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांना आर्थिक मागास वर्गात अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन म्हणजे दिशाभूल आहे. मराठा समाजासाठी चारशे कोटीची स्वंतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे. ‘सारथी’ला सक्षम करण्याची गरज आहे. मराठा समाजाला चांगले पॅकेज देण्याची गरज असतानाही केवळ मलमपट्टी करण्याचे काम सुरु आहे.”

“ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको. फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे. सगळ्यांना सामान न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.” असा घणाघात प्रवीण दरेकरांनी केला आहे.

महाराष्ट्र बंदची हाक!

येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :