मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले आहे.
शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मात्र सध्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीकडे 4 आमदारांचा आकडा कमी झालेला दिसतो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ कोरोनाग्रस्त आहेत. तर मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सध्या संकटात सापडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayyad : “हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून युती केली तर पुढची साडेसात वर्षे.. ” ; दीपाली सय्यद यांचा शिंदेना सवाल
- Special Session : विशेष अधिवेशन घेत असताना राज्यपालांनी ठाकरे सरकारला घातल्या ६ अटी!
- Keshav Upadhye : “आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत..”, केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना सल्ला
- Maharashtra Crisis : बहुमत चाचणीच्या निर्णयाला ‘शिवसेने’चे सुप्रीम कोर्टात आव्हान
- Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, संजय राऊतांचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<