पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार

mhv

कोल्हापूर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होणार आहे. निवडणूक लवकर होणार नाही या भ्रमात असणाऱ्या इच्छुकांना याची कुणकुण लागताच सारे अचानक चार्ज झाले आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ते एकदम सक्रिय झाले असून ही निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप अशीच रंगणार आहे.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सलग दोनवेळा येथून विजयी झाले. या पक्षाची हॅट्रिक साधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पक्षाकडून इच्छूकांची यादी मोठी आहे. या पक्षाची उमेदवारी पुणे जिल्ह्यात मिळणार की कोल्हापूर एवढीच आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादीला ही जागा मिळणार हे निश्चित आहे.

क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांचे नाव सध्या या पक्षाच्यावतीने आघाडीवर आहे. शिक्षक मतदारसंघासाठी भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेने जितेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपता ही जागा काँग्रेसला मिळणार असून या पक्षाच्या उमेदवारीसाठी सुजाता माळी, दादासाहेब लाड यांच्यासह अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यमान आमदार सावंत देखील रिंगणात उतरणार असून टीडीएफ व कृती समितीच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीला तर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसला मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. पण शिवसेनेला येथे केवळ पाठिंबा देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे या दोन्ही मतदारसंघात सेनेची फारशी ताकद नाही. यामुळे हा पक्ष उमेदवारीसाठी आग्रह धरण्याची शक्यता नाही.

शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक घेण्याची निवडणूक विभागाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे दोन तीन दिवसात निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात यासाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत. अनिल वळवी, सहा. निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग

पदवीधर मतदारसंघ इच्छुक

भाजप – राजेश पांडे, शेखर चरेगावकर, माणिक पाटील चुयेकर, रोहन देशमुख, सचीन पटवर्धन, प्रसन्नजित फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस – अरूण लाड, नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने.

महत्वाच्या बातम्या :-