महात्मा गांधींच्या पणतीने केला ६२ लाखांचा ‘स्कॅम’; कोर्टाने सुनावला ७ वर्षांचा तुरुंगवास

ashish lata ramgobin

डरबन : महात्मा गांधी यांचं नाव जगभरात आजही आदराने घेतलं जातं. मात्र आता त्यांच्या पणतीने केलेल्या स्कॅमची चर्चा जगभरात रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पणतीला तेथील न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

५६ वर्षीय आशिष लता रामगोबिन यांना डरबनच्या एका कोर्टाने ६२ लाखांच्या (६२ लाख दक्षिण आफ्रिकन रँड) फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी कोर्टाने त्यांचा निर्णय सुनावत आशिष लता रामगोबिनला दोषी ठरवलं आहे. त्या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांच्या कन्या आहेत.

काय आहे हे प्रकरण ?

स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख हडपले. या घटनेतील पीडित एसआर महाराज यांनी सांगितले की, नफ्याचं आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. व्यावसायिक एसआर महाराज यांनी आशिष लता यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ६२ लाख दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतंही कन्साइमेंट नव्हतं. होणाऱ्या नफ्यातून काही वाटा एसआर महाराज यांना देऊ असं आमिष लताने दिलं होतं. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून महाराज यांची फसवणूक केल्याचं अखेर सिद्ध झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या