‘महात्मा गांधी बोलायचे ते करायचे देखील, पण आज आपल्याकडे..’ राहुल गांधींची मोदींवर टीका

‘महात्मा गांधी बोलायचे ते करायचे देखील, पण आज आपल्याकडे..’ राहुल गांधींची मोदींवर टीका

वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान केरळमधील वायनाड या त्यांच्या संसदीय मतदारसंघाच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले असतांना पहिल्या दिवशी त्यांनी मंथवडी येथील गांधी पार्क मधील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला.

ते म्हणाले की, ‘आज आपल्याकडे अनेक लोक आहेत, जे म्हणतात की त्यांना न्याय्य देश हवा आहे आणि तेच इतरांशी अन्यायकारक वागतात. ते म्हणतात की त्यांना असा भारत हवा आहे जो महिलांचा आदर करेल आणि मग ते स्वतः महिलांचा अनादर करतात. ते म्हणतात की त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे आहे, पण ते स्वतः धर्मांना वेगळ्या दृष्टीने पाहतात.

पुढे ते म्हणाले की, ‘महात्मा गांधींची सर्वात शक्तीशाली गोष्ट ही होती की, त्यांनी जे काही सांगितले, त्याला आचरणातही आणले. त्यामुळेच जर त्यांनी म्हटलं की भारत सहिष्णू देश झाला पाहिजे तर ते सहिष्णूपणे वागले. जर त्यांनी म्हटले की भारताने महिलांचा सन्मान केला पाहिजे, तर ते देखील महिलांशी सन्मानानेच वागले.’

दरम्यान, राहुल हे त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर असून १७ ऑगस्ट रोजी ते कालपेट्टाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट आहेत. तसेच त्यानंतर ते कारसेरी पंचायत शेतकरी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन असून कारसेरी बँक सभागृह, नॉर्थ कारसे, तिरुवम्बादी येथे शेतकऱ्यांचा सत्कार करतील. त्यानंतर, ते मलप्पुरम येथील वंदूर येथील गांधी भवन स्नेहाराम वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत दुपारचे जेवण करतील.

महत्त्वाच्या बातम्या