दारूच्या बाटलीवर महात्मा गांधींचा फोटो, कंपनीने मागितली माफी

टीम महाराष्ट्र देशा :  इस्त्राइलमधील एका दारूच्या कंपनीने दारूच्या बाटलीवर चक्क महात्मा गांधींचा फोटो लावला होता. दरम्यान यासर्व प्रकाराबाबत इस्त्राइल कंपनीने भारतीयांची भावना दुखवल्या बाबत माफी मागितली आहे. इस्त्राईलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या दारू उत्पादनाची निर्मीती करण्यात आली होती.

इस्त्राइलमध्ये एका दारूच्या दुकानात बाटल्यांवर महात्मा गांधींचा फोटो आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. इस्त्राइलमधील एका दारूच्या कंपनीने दारूच्या बाटलीवर चक्क महात्मा गांधींचा फोटो लावला होता. या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह तसेच राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी नवी दिल्लीत निषेध केला होता. इतकेच नव्हे तर या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही केली होती.

Loading...

राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडु यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या विषयावर चौकशी करण्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत कारवाई केली असता त्या कंपनीने भारतीयांची भावना दुखवल्या बाबत क्षमा मागितली.

इतकेच नव्हे तर आम्हीदेखील महात्मा गांधी यांचा सन्मान करतो, बाटल्यांवर महात्मा गांधी यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही माफी मागत आहोत, असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’