राष्ट्रपिता महात्मा गांधी राजस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार पटकावला नगरच्या शाहीराने !

नगर – राष्ट्रपिता महात्मा गांधी राजस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार २०१८ – २०१९ पुरस्कार विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. यात राज्यभरातील ४१ व्यक्ती व १० संस्थेचा समावेश करण्यात आला असून, पारनेर येथील शाहीर बलभीम शिंदे यांचा ही समावेश आहे.

पारनेर/ टाकळी ढोकेश्वर येथील शाहीर शिंदे यांना त्यांच्या आयुष्यभर केलेल्या समाजकार्याची पावती या पुरस्कारामुळे मिळाली आहे. शाहीर बलभीम शिंदे हे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा याठिकाणी वरिष्ठ मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. १९८२ पासून शाहिर बलभीम हे शाहीरी, पोवाडे, प्रबोधन, या माध्यमातून समाज जनजागृती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, हुंडाबळी असे समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत.

शाहीर बलभीम शिंदे यांना आता पर्यंत असंख्य पुरस्कार प्राप्त झाले असून आता गगनाला गवसणी घालत त्यांनी सरळ राजस्तरीय पुरस्कार पटकावला आहे. रविवारी ३ फेब्रुवारी (उद्या) रोजी चांदा क्लब चंद्रपूर जिल्हा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.