Tushar Gandhi | मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळातून यावर पडसाद उमटत आहेत. अशातच महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
राहुल गांधी खरं तेच बोलले, असं तुषार गांधी म्हणाले आहेत. तुषार गांधी (Tushar Gandhi) आज शेगावमध्ये राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो.”
“राहुल गांधींनी मांडलेलं मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवलं, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाहीये हे कळून येतं”, असंही तुषार गांधी यांनी म्हंटलंय.
काय म्हणालेत राहुल गांधी?
सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेनेत सावरकरांवरुन मतभेद! काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण
- Devendra Fadnavis | “…तर कारवाई करु” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
- T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतरही पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना मिळाले करोडो रुपयांचे बक्षीस
- MNS | पप्पू हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत मनसेचं आंदोलन
- MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधींची सभा उधळण्यास गेलेल्या मनसे नेत्यांना रोखलं