MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल निधनाची बातमी केवळ अफवा

नवी दिल्ली – एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतचे वृत्त अफवा असल्याची माहिती समोर आले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये महाशय धर्मापाल यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी (6 ऑक्टोबर) रात्रीपासून सोशल मीडियावर महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाचे वृत्त पसरले होते. पण ही केवळ अफवा असल्याचे महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गुलाटी यांचा व्हिडीओ जारी करत त्यांच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला आहे.