शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये महासभा घेऊन करणार शक्तीप्रदर्शन

Uddhav_Thackray

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यभरातील साधू आणि वारकरी संत यांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी पंढरपूरमध्ये महासभा घेऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली असून राज्यभरातून पाच लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सभेला उपस्थिती लावणार आहेत. . या महासभेतून पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्याने ही सभा लक्षवेधी ठरणार आहे.

आज पर्यंत नरेंद्र मोदी वगळता इतरांच्या सभांचा या मैदानावर फज्जा उडाला आहे. सभेचे स्टेज हे ८० फूट लांब आणि ६० फूट रुंदीचे असून उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेना नेते बसणार आहेत. त्याशेजारी दोन्ही बाजूला उभारलेल्या स्टेजवर राज्यातील साधू आणि वारकरी संतांना स्थान देण्यात येणार आहे.