राईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत

 टीम महाराष्ट्र देशा : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना राईनपाडामध्ये १ जुलैला घडली होती. मुलं पळवण्याच्या अफवेतून ५ जणांची ठेचून हत्या करण्यात आली होती. राईनपाडा आणि परिसर हा आदिवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. राईनपाडा इथं रविवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं अफवेची चर्चा जास्त झाली. यात मृत पावलेल्यांची नावे भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अप्पा श्रीमंत भोसले, राजू भोसले अशी आहेत.

संतप्त नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.

राईनपाडा हत्याकांडातील मुख्य आरोपीला नवापूरमधून अटक करण्यात आली आहे. महारू पवार असं त्याचं नाव आहे. याच प्रकरणातल्या मुख्य आरोपीला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या पथकानं अटक केली आहे. यामुळे अन्य आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होईल.

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजातून मालेगावमध्ये चौघांना बेदम मारहाण

संतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती

दातांचा पिवळेपणा एका मिनिटात घालवा !