सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राने अग्रेसर राहावे – राज्यपाल

solar pune

टीम महाराष्ट्र देशा – सौरऊर्जा निर्मिती आणि वापरात महाराष्ट्राने आघाडीवर राहावे. त्यासाठी राज्य शासनाने अधिकची आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे.पुणे येथील राजभवन परिसरात एक मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.

त्यावेळी राज्यपाल बोलत होते. केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅटवरून एक लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नविनीकरण ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायला हवा. आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल.

Loading...

कारण आता सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय झाला आहे. आपल्या देशात सौरुर्जेची प्रचंड निर्मिती होऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागात वर्षातून २५० ते ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे आपली उर्जेची गरज सौरनिर्मितीतून भागवू शकतो, असे राज्यपाल राव यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन सामान्य माणसाला खुले करून त्याला लोकभवनाचे रूप दिले. अपारंपारिक ऊर्जेच्या वापरला चालना देण्यासाठी राज्यातील तीनही राजभवनात सौरऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे राजभवनाच्या एकूण वापराहूनही जास्त वीज निर्मिती होईल.’राज्य शासनाने वीज निर्मिती बरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे.

याद्वारे एक हजार मेगावॅट वीज बचत केली जाऊ शकते. एलईडी बल्बचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. राळेगणसिद्धी येथे पहिल्या फिडरचे भूमिपूजन झाले आहे. उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालवण्याचा विचार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.पुणे येथील राजभवन परिसरात एक मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, मेडाचे महासंचालक राजाराम माने आणि राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅटवरून एक लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नविनीकरण ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायला हवा.

आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल. कारण आता सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय झाला आहे. आपल्या देशात सौरुर्जेची प्रचंड निर्मिती होऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागात वर्षातून २५० ते ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे आपली उर्जेची गरज सौर निर्मितीतून भागवू शकतो, असे राज्यपाल राव यांनी सांगितले. वीजनिर्मितीबरोबर बचतीचेही धोरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन सामान्य माणसाला खुले करून त्याला लोकभवनाचे रूप दिले.

अपारंपारिक ऊर्जेच्या वापरला चालना देण्यासाठी राज्यातील तीनही राजभवनात सौरऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे राजभवनाच्या एकूण वापराहूनही जास्त वीज निर्मिती होईल.’राज्य शासनाने वीज निर्मिती बरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे. याद्वारे एक हजार मेगावॅट वीज बचत केली जाऊ शकते. एलईडी बल्बचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. राळेगणसिद्धी येथे पहिल्या फिडरचे भूमिपूजन झाले आहे. उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालवण्याचा विचार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?