भाजप आणि काँग्रेस म्हणजे राम-श्यामची जोडी

टीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही रामरहिम नाही तर राम-श्यामची जोडी आहे. एकजण मानेवर तर दुसरा पाठीत खंजीर खुपसत आहे, असा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

या दोन्ही दोघांचे विचार एक असून, विचार मात्र फक्त स्वत:चाच करतात. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व मुस्लिम बांधवांनी काँग्रेस-भाजप या राहू-केतूच्या जोडीपासून दुरच राहावे, असेही ओवेसींनी नंदुरबार शहरातील आगामी नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सभेत मार्गदर्शन करताना सांगितले.