महाराष्ट्राच्या चिंतेत भर ; दिवसभरात तब्बल ६ हजार २१८ नवे कोरोना रुग्ण

maharashtra corona

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने नव्याने डोके वर काढले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे ६२१८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, ५८६९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात ५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.४५ टक्क्यांवर आहे.

अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ लाख १२ हजार ३१२ वर पोहोचला आहे. काल राज्यात ५ हजार २१० कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आजसुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज १००० नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते आगामी काळात अशाच प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित असून अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9399 एवढी आहे. तर मुंबई, ठाण्यात अनुक्रमे ६११९ आणि ६१७७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५५९५ एवढी आहे. तर नागपुरात सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा ६८३२ वर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या