पुणे मेट्रोचं भूमिपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदरच काँग्रेसने पुणे मेट्रोचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपलं आहे.  कुदळ मारुन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या २४ डिसेंबरला पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

उद्या होणाऱ्या मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.दरम्यान, पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला. त्यामुळे मेट्रोचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यानंतर आज अखेर काँग्रेसने भूमिपूजन केलं आहे.

दरम्यान, भाजपनं पुणे मेट्रोआधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला आहे. महापालिकेनं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरवलं असताना मोदींच्या हस्ते उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.पुणे मेट्रोचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे.आम्ही टिकाव टाकून भूमिपूजन केल उदया काही लोक बटन दाबून भूमिपूजन करतील कारण त्यासाठी मनगटात बळ असाव लागत.

मेट्रोची योजना काँग्रेसची. त्याला सर्व मान्यता काँग्रेसने दिल्या त्यामुळे भूमिपूजन आम्हीच केल
– हर्षवर्धन पाटिल