महाराष्ट्राला पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळणार : कर्नल मौर्य

टीम महाराष्ट्र देशा : वर्षभरातील कामगिरी व राजपथ पथसंचलनासाठीचे शिबिर या दरम्यान विविध स्पर्धांच्या आधारावर सर्वोत्तम एनसीसी संचालनालयासाठी दिला जाणारा ‘पंतप्रधान बॅनर’ हा बहुमानाचा निकाल 27 जानेवारी रोजी घोषीत होणार आहे. गेल्या 27 वर्षांपैकी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनरचा’ बहुमान मिळवणारा महाराष्ट्र यावर्षीही हा बहुमान मिळवणार तसेच बेस्ट कॅडेट्सचा पुरस्कारही राज्याच्याच वाट्याला येणार असा विश्वास कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी व्यक्त केला.

या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत येथे पार पडलेल्या ड्रिल स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागरुकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेट्स सहभागी झाले असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकातील सहभागासाठी आणि एनसीसी कॅडेटसची गणमान्य व्यक्तींच्या भेटी दरम्यान एनसीसीच्यावतीने सादर होणाऱ्यासांस्कृतिक कार्यक्रमासाठी कॅडेट्सची निवड प्रक्रिया सुरु असून त्यातही महाराष्ट्राच्या कॅडेटसची मोठ्या संख्येने निवड होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...