नागपूर अधिवेशन; पहिल्याच दिवशी सादर केली 10 विधेयक

blank

नागपूर :  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालीय. अडीच आठवड्याच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात प्लास्टिक बंदी,  शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जमीन घोटाळ्यावरून, विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 10 विधेयकं मांडण्यात आली. हैद्राबाद अतियात विधेयक आणि महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अशी दोन विधेयकं मागे घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. हे विधेयक चर्चेचे असल्याने ते आज मांडू नये असा आक्षेप अजित पवार यांनी घेतला. यावर सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय स्वीकारला. या कामकाजानंतर कृषी मंत्री भावसाहेब फुंडकरसह दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.