सरकारच्या विरोधात घोषणा देत, विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर : नागपूर येथे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात आणि विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणी साठी प्रकाश गजबिये यांनी त्याचा पेहराव करून आंदोलन केलं. तर दुसऱ्या दिवशी सरकारने पिकांना दिलेला  हमीभाव ही शेतकऱ्यांची  फसवणूक असल्याचा आरोप करत, विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तसेच’शेतकऱ्यांना हमिभावाच गाजर दाखवणाऱ्या सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देखील विरोधकांकडून यावेळी देण्यात आल्या.

Loading...

दरम्यान केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली असून,धान्यांच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि दुष्काळाने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला मोठा दिलासा मिळालाय. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीत २०० रुपयाने वाढ करून १८०० रूपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. दहा वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली असून, याआधी  यूपीए सरकारने १५५ रुपयांची वाढ केली होती.

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये अटकLoading…


Loading…

Loading...