fbpx

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये अटक

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालीय. अडीच आठवड्याच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात प्लास्टिक बंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जमीन घोटाळ्यावरून, विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अधिवेशनाच्या पाहिल्याचं दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अंदोलन पुकारण्यात आलं होतं.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली. मात्र, बंदच्या आव्हानाला तुरळक प्रतिसाद मिळाला. सकाळी ११नंतर विदर्भवादी काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. व्हरायटी चौकात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुमारे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी ‘विदर्भविरोधी आमदारांनो परत जा’ अशी घोषणा देखील देण्यात आली. सरकार आमचं आंदोलन हुकुमशाही करुन दडपत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी सरकारवर केला.

 

अधिवेशन एक दिवसावर आलं असताना नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूर अधिवेशन; पहिल्याच दिवशी सादर केली 10 विधेयक