विधानपरिषदेच्या चार जागांचा निकाल आज

मुंबई : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामध्ये कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा समावेश आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली.

bagdure

विधान परिषदेच्या चार जागांवर जरी निवडणूक होत असली तरी मात्र सर्वांच लक्ष हे कोकण पदवीधर मतदारसंघांवर आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे डावखरे यांच्या भाजप प्रवेशाने नाराज असलेल्या राष्ट्रवादीने त्यांच्या पराभवासाठी कंबर कसलीये. त्यामुळे या मतदार संघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

You might also like
Comments
Loading...