महाराष्ट्र-यूपीच्या उसामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण पेटले

पुणे (भारतीय वृत्त संस्था) : जागतिक बाजार पेठेमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठया प्रमाणावर साखरेची निर्यात होते. माञ, सारखेची निर्यात प्रमाणापेक्षा अधिक होत असल्यामुळे जागतिक बाजार पेठेत साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे साखरेचे मोठे निर्यातदार देश असलेल्या भारत आणि पाकिस्तानने निर्यातीवर निर्बंध आणण्याची मागणी ऑस्ट्रोलियाकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानने उसाचे किमान आधारभूत मूल्यामध्ये वृद्धी केली आहे. त्यामुळे हे दोन देश जागतिक साखर पूरवठा नियंञीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा ऑस्ट्रोलियाचे व्यापारी मंञी सायमन ब्रीमीनघम यांनी केला आहे.

या संदर्भात सायमन ब्रीमीनघम यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला साखर दरांसंदर्भात प्रतिक्रिया देताना हा दावा केला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी उसाला दिलेल्या अनुदानावर देखील आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रोलियातील उस उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दरामध्ये उस विकावा लागत आहे. यामुळे तेथील शेतक-यांनी यासंदर्भात सरकारकडे मोठया प्रमाणावर साखर आयात करणा-या देशांसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा प्रामुख्याने सामावेश आहे. यामुळे ऑस्ट्रोलियन साखर उद्योगाच्या वतीने ब्राझील, थायलंड आणि गॉटेमाला या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय साखर निर्यातीवर निर्बंध आणण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे केनग्रावर्स या ऑस्ट्रोलियन उस उत्पादकांच्या संस्थेने नुकतेच एका प्रसिद्ध करण्यात आलेल्या पञकामध्ये सांगितले आहे.

असे असले तरी, भारताने निर्धारीत केलेल्या सारख निर्यातीच्या लक्षानुसार सप्टेंबर २०१८ अखेरपर्यंत किमान २० लाख टन सारख निर्यात होणे अपेक्षीत आहे. माञ, जूलै अखेर पर्यंत हा आकडा केवळ ३.५ लाख टन इतकाच होता. त्यामुळे सप्टेंबर अखेर पर्यंत साखरेची अपेक्षित निर्यात होणे कठिण असल्याचे सांगितले जात आहे. भारतामध्ये उसाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये होते. यामुळे या दोन्ही प्रदेशांमध्ये होणा-या साखरेच्या उत्पादन आणि निर्यातीचा परिणाम थेट इतर देशातील बाजार पेठांवर होत आहे. भारत येत्या काही दिवसांमध्ये साखर उत्पादन आणि निर्यातीमध्ये ब्राझीलला देखील मागे टाकेल असे भाकित वर्तवण्यात आला आहे.

या घडामोडींचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटू लागले आहेत. न्यूयॉर्कच्या बाजारात कच्च्या साखरेचे मोठया प्रमाणावर कोसळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या साखरेच्या दराचा गेल्या दशकतील निच्चांक ९.९१ सेंट हा दर दि. २२ ऑगस्ट रोजी नोंदवण्यात आला आहे. यानंतर ऑस्ट्रोलियान राजकारण देखील पेटले आहे. ऑस्ट्रोलियातील शेतक-यांचे दर वर्षी ५०० मिलीयन डॉलर्सचे नुकसान होत असल्याचा दावा देखील उस उत्पादकांनी केला आहे.

मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !