महाराष्ट्र ‘अंधाराकडे’, लवकर पावलं उचलली नाहीत तर…; माजी उर्जा मंत्र्यांची चिंता

चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रील अनेक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडले आहेत. विजेची ही तूट भरुन काढण्यासाठी तातडीने वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीज उपलब्ध करण्याची गरज आहे. तसेच वीजेचा वापर काटकसरीने करण्याचे अवाहनही महावितरणने केले आहे. वीज संकटाला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

भाजपनेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी सरकारच्या उर्जाधोरणावर टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले, केंद्रीय कोळसा कंपन्यांचे २८०० कोटी रुपये महाधनकोकडे शिल्लक आहेत. कोळसा कंपन्यांना पैसे देणार नसाल तर त्या कोळसा कसा देतील? आमच्या काळात कधीही इतके पैसे थकीत राहीले नाही. आम्ही ३२ लाख टन कोळश्याचा साठा नेहमी राखून ठेवत होतो. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी नियोजन केले. मात्र सत्ताधारी सरकारच्या दुलर्क्षामुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट येणार आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आज ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीची वीज सुरु आहे. लोडशेडिंग सुरु केलं आहे. कोळसा कंपन्यांचे जर २८०० कोटी रुपये देणं असेल आणि त्यांनी हात काढून घेतल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर बनेल. मुख्यमंत्री उर्जामंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. प्रशासनावरचे सरकारचे नियंत्रण सुटल्याने ही स्थिती उद्भवली आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या