मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 11 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात एकूण 10 हजार 219 रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात एकूण 21 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 64 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.25% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 1.72% इतका आहे.
राज्यात 12 लाख 47 हजार 33 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 6 हजार 232 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1 लाख 74 हजार 320 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार’
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…