आज सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प, राज्य सरकार दुष्काळासाठी करणार मोठी तरतूद

सुधीर मुनगंटीवार

मुंबई: आज महाराष्ट्र विधिमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात पुढील तीन महिन्यांचे नियोजन केले जाणार आहे. तर जून – जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सरकार दुष्काळासाठी मोठी तरतूद करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

आगामी एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दुपारी दोन वाजता विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडतील.