टीम महाराष्ट्र देशा: सरकार अनेक भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत असते. कारण कोरोना महामारीनंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवयुवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक भरती प्रक्रिया राबवत असते. अशात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील परभणी (Parbhani) विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी, या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
MSRTC मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 57 जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये व्यावसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार पदांच्या 57 रिक्त जागांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
MSRTC यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
20 डिसेंबर 2022 पर्यंत इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी पदांनुसार पात्रता उमेदवारांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्वाच्या बातम्या
- Suryakumar Yadav | विराट कोहलीसोबत सामना झाल्यास कोण जिंकणार?, प्रश्नावर सूर्याने दिले मजेशीर उत्तर
- Shubhaman Gill | शुभमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
- Immunity Booster Tips | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो
- FIFA World Cup 2022 | फिफा परफॉर्मन्ससाठी नोराची जोरदार तयारी, आज करणार Live सादरीकरण
- Maharashtra Winter Update | उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला, तर विदर्भातील ‘या’ जिल्ह्यामध्ये झाली सर्वात कमी तापमान नोंद