fbpx

जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; खडसेंचे पुनरागमन होणार का ?

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हे फेरबदल २३ मे ला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालांवर अवलंबून असणार आहे. तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी भाजप ही खेळी खेळत असल्याच बोललं जात आहे. जर विस्तार झाला तर कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार आणि कुणाला पक्षात प्रवेश मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच एकनाथ खडसे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभेत खडसे यांचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्याता आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव याआधीच भाजपमध्ये असल्याने विखे आणि मोहिते पाटील यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.