अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला; प्रकाश मेहतांना डच्चू मिळणार ?

मुंबई: वर्षभरापासून लांबणीवर पडत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारला अखेर मुहूर्त मिळाल्याची माहिती मिळत आहे, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विस्ताराचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सोमवारी भेट घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर एसआरए घोटाळ्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छंती होणार असल्याच बोलल जात आहे.