मराठ्यांच्या वज्रमुठीने सरकार नरमले; मान्य केल्या या मागण्या

maratha kranti morcha11

मुंबई : मुंबईत निघालेल्या अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चामुळे अखेर राज्य सरकारला मराठा समाज्याच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. आज मुंबईत तब्बल २५ लाखांच्यावर मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर मराठा समाजाची कमिटी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली .

या मागण्या मान्य

आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा

६०५ अभ्यासक्रमात मराठा विद्यार्थ्यांना सवलत

ओबीसी सवलत मराठा समाजाला मिळणार

सवलतीमुळे १० लाख विद्यार्थ्यांना फायदा

कौशल्य विकास योजनेतून ३ लाख लोकांना नोकरी मिळणार

मराठा विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह असणार

प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहसाठी ५ कोटी रुपये दिले जाणार

कोपर्डी प्रकरणी लवकरच युक्तिवाद सुरु होईल

६०५ मराठा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मिळणार सवलत

सर्व ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ती लागू होणार जी ओबीसीला आहे…

ओबीसी प्रमाणे शिष्यवृत्ती – राज्य सरकार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन लाख शेतकर्यांच्या मुलांना रोजगार देणार ,10 लाख पर्यंतच कर्ज उपलब्ध करून देणार..!