Samruddhi Mahamarg- समृद्धी महामार्गावरील संपादित जमिनीचा सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला दिला जावा- अर्जुन खोतकर

जालना- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई – नागपुर  ” समृद्धी महामार्ग ” हा मराठवाडा-विदर्भयांच्या विकासाला चालना देणारा, वाहतुक ,दळणवळण,उद्योग, व्यापार तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प आहे.

मुंबई समृद्धी महामार्गावरील संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला दिला जावा असं मत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं आहे. या मार्गावरच्या संपादित केलेल्या जमिनीसंदर्भात जालना जिल्ह्यातल्या शेतकरी तसंच संघर्ष समितीनं नोंदवलेल्या आक्षेपांसंदर्भात काल खोतकर यांनी जालना इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना तसंच बदनापूर तालुक्यातल्या काही गावांमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी नुकतीच मोजणी करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्ग …महाराष्ट्राचा राजमार्ग