‘त्या’ दोन मराठी तरुणांना ‘महाराष्ट्र सदनात’ प्रवेशबंदी

नवी दिल्ली : सरकारविरोधी आंदोलन केल्याचा राग मनात ठेवून दोन मराठी युवकांना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे . अधिक चन्ने आणि प्रसाद खामकर अशी या दोघांची नावे आहेत.पानिपतावरच्या मराठा शौर्य दिनासाठी हे दोन युवक दिल्लीत आले होते. कार्यक्रम संपल्यावर आज नवीन महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये यायला ते निघाले होते. त्यावेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आलं.

maharashtra sdn

Loading...

एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ,काही दिवसांपूर्वी राज्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचं जे आंदोलन झालं होतं, त्यात या दोघांची भूमिका होती. त्यानंतर प्रसाद खामकरला खात्यातून निलंबितही करण्यात आलं होतं.महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अतिरिक्त निवासी आयुक्त अजित नेगी यांनी या युवकांबद्दल इंटेलिन्सचा रिपोर्ट मिळाल्यानं त्यांना प्रवेश घेऊ दिला नाही असं कारण पुढे केलंय.दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये एरव्ही दिल्लीतले शेकडो अमराठी, परप्रांतीयही येत असतात. मग मराठी व्यक्तींना केवळ कॅन्टीनमध्ये जाण्यापासून रोखण्याचं कारण काय असा सवाल या दोन तरुणांनी उपस्थित केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत