महाराष्ट्र हादरला : २४ तासांत रेकोर्डब्रेक ८ हजार ६४१ नवीन रुग्णांची नोंद

Corona Negative

मुंबई : राज्यात आज ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे.

आनंदाची बातमी : राज्यात आज एकाच दिवशी ५५२७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

राज्यात करोना रुग्णांचे वाढते प्रमाण व मृतांच्या संख्येत होणारी वाढ यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यात सध्या ३. ९४ टक्के इतका मृत्यूदर आहे. २४ तासांत करोनाने २६६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात १४ लाख ४६ हजार ३८६ इतक्या करोना चाचणी झाल्या असून त्यातील १९.६५ टक्के रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाले तर बाकी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन