Share

Maharashtra Rain Update | राज्यात आज ‘या’ भागांत पावसाचा येलो अलर्ट

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातलेले आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात राज्यात पावसाची चांगली हजेरी लागली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर पालघर, जळगाव, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झालेला आहे. तर, आज देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात परतीच्या पावसाचा जोर 

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्याचबरोबर या पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. हात तोंडाशी आलेल्या शेतीतील पिकांना पावसाने चांगलं झोडपलं आहे. सध्या पीक काढणीचा हंगाम सुरू असून सोयाबीन आणि कापूस पिकाच मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत आजही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर, या जोरदार पावसामुळे सोयाबीन, कापूस, ऊस, तूर, सोयाबीन, फळबागा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटनसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातलेले आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now