टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुणे, मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील पावसाची चांगलीच हजेरी बघायला मिळाली. त्याचबरोबर औरंगाबाद, सातारा, सिंधुदुर्ग, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने चांगलेच थैमान घातले. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात परतीचा पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यात आज काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात सध्या परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला नुकसानाला तोंड द्यावे लागणार आहे. शेतीतील सोयाबीन, मूग, कापूस फळबागा इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. यावेळी तर म्हणाले, ” राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये.”
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या राज्यात शेतीतील पीक काढण्याच्या हंगाम सुरू आहे. शेतीतील सोयाबीन, कापूस, मूग तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी राज्य सरकारकडे करत आहे. कारण काढणीला आलेले सोयाबीन आता पाण्यात मिळाले असून कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे.
राज्यात आजही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान, आजही राज्यात काही भागात विजांच्या कडकडाटंसह पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज काही भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- MNS | “कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?…”, ‘या’ मनसे नेत्याने उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र
- Kishori Pednekar | ‘आईसक्रीम कोन’च्या विधावरुन किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंवर हल्ला
- Rahul Gandhi | “सिलेंडरची किंमत ४०० रुपये होती तेव्हा पंतप्रधान तक्रार करायचे, आता…”, राहुल गांधींनी विचारले सवाल
- Rohit Pawar | दिवाळी पहाट कार्यक्रमावरून रोहित पवारांचा शिंदे सरकारला टोला
- Ajit Pawar | “…तो पर्यंतच शिंदे सरकार टिकणार”, अजित पवारांचं भाकीत