Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाची धूम सुरू आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. दरम्यान, 17 आणि 18 ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या देखील हवामान खात्याकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आज आणि उद्या मुंबईमध्ये पाऊसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईबरोबरच ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या परतीच्या पावसाने सगळीकडे थैमान घातले असून राज्यातील शेतकरी मोठ्या त्यामुळे संकटात सापडला आहे.

मुंबई शहरामध्ये जोरदार पावसाची शक्यता

मुंबई शहरांमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आलेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात सर्वत्र पावसाची धूम

दिवाळी तोंडाशी आली तरी राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील गेल्या दहा वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याची नोंद झाली आहे. अवघ्या बारा दिवसात राज्यातील 15 जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वाढल्याने ऑक्टोबर मध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर राज्यातील 15 जिल्ह्यात अतिवृष्टी म्हणजे 60 टक्क्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असून 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात ‘या’ भागांमध्ये पावसाचा अंदाज ( Maharashtra Rain Update )

राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. तर, काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाची धूम सुरू आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले …

पुढे वाचा

Agriculture Kolhapur Maharashtra Mumbai Nagpur Nashik Pune Satara