Share

Maharashtra Rain Update | पुणे शहराला परतीच्या पावसाने झोडपलं, तर शहरात पुढील दोन दिवस ‘येलो अलर्ट’

पुणे : राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पाऊसाची धूम सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात काल ( 14 ऑक्टोबर 2022) रोजी परतीचा पाऊस परत फिरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. काल पुणे शहरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पुण्यात काल दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरांमध्ये दीड ते दोन तास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साठलेले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहरात या भागातील रस्त्यांवर साचलं पाणी

सतत पडत्या पावसामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळाल. काल पुणे शहरांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यामध्ये शहरातील फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, टिळक रोड, येरवडा, संगमवाडी आणि आपटे रोड या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली असून शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. कालच्या पावसाने पुणेकरांना हैराण करून टाकले होते.

पुण्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट

गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपलं आहे. या पावसामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. तर काल पुणे शहरामध्ये संध्याकाळच्या दरम्यान या परतीच्या पावसाने चांगलीच धुमाकूळ घातली होती. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे सह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाला असून राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या राज्यात शेतीतील पीक काढण्याच्या हंगाम सुरू आहे. शेतीतील सोयाबीन, कापूस, मूग तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान खात्याने अंदाजानुसार राज्यात आजपासून परतीचा पाऊस माघारी करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

पुणे : राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पाऊसाची धूम सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळत आहे. यामुळे …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now