टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या आठवाभरापासून परतीच्या पाऊसाने थैमान घातले आहे. राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत आज हवामान खात्याकडून ढगाळ वातावरणासह परतीचा पाऊस परत जाण्याचे अंदाज देण्यात आले होते. पुणे शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याकडून कोकण, मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. कारण राज्यात सध्या पीक काढणीचा हंगाम सुरू असून या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिक काढण्याचा हंगाम सुरू असून परतीच्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान परतीचा पाऊस चांगलाच बरसणार असल्यामुळे हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
पुणे शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी
आज पासून परतीचा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर राज्यात पुण्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. पुणे शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि दुपारी 4 च्या सुमारास शहरामध्ये विजांच्या कडकडाटंसह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. या अचानक बरसलेल्या सरींमुळे शहरातील नागरिकांची वाहतुकीची कोंडी झाली असून नागरिकांना गैरसोयी सामोरे जावे लागले आहे.
परतीच्या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाला असून राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या राज्यात शेतीतील पीक काढण्याच्या हंगाम सुरू आहे. शेतीतील सोयाबीन, कापूस, मूग तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान खात्याने अंदाजानुसार राज्यात आजपासून परतीचा पाऊस माघारी करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sachin Sawant । “नकला आणि कलाविष्कारमधील फरक…”; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ
- Uddhav Thackeray । रामदास आठवलेंना मोठा धक्का!, आठवले गटातील या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
- Diwali 2022 | दिवाळीची मिठाई खरेदी करत असाल, तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या
- Sushama Andhare । “मी माझं बाळ शिवसेनेला दत्तक दिलंय..” ; सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका?
- Sudhir Mungantiwar – नरेंद्र मोदी यांची उंची एव्हरेस्ट पेक्षा मोठी आहे – सुधीर मुनगंटीवार