टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून दिवाळीची एक विशेष भेट! काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत विविध पदांच्या 378 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची तारीख उलटून गेलेली असून राज्य सरकारकडून इच्छुक उमेदवारांना ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. यामध्ये वनविभाग, कृषी विभाग आदींचा समावेश आहे.
MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या 378 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्या मार्फत तब्बल 378 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. MPSC मार्फत सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी आधी 23 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत होते. पण ताज्या अपडेटनुसार, इच्छुक उमेदवार 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल.
विविध पदांच्या 378 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे :
- वनक्षेत्रपाल पदांच्या १३ जागा
- उपसंचालक (कृषी) पदांच्या ४१ जागा
- तालुका कृषी अधिकारी पदांच्या १०० जागा
- कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदांच्या ६५ जागा सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदांच्या १०२ जागा
- सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदांच्या ४९ जागा
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी पात्रधारक उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्वाच्या बातम्या
- Whatapp Down | अर्ध्या तासापासून व्हाट्सअप बंद,तर ट्वीटरवर मीम्सचा पाऊस
- Eknath Shinde | सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Eknath Shinde | मनसेसोबतच्या महायुतीवर एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Soler Eclipse | सूर्यग्रहण संबंधित आजही ‘हे’ समज आहेत कायम
- Eknath Shinde | मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर थेट एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…