काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ अशोक चव्हाणांच्याचं गळ्यात राहणार?

ashok-chavhan

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला परंतु चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेस हाय कमांडने स्वीकारला नसल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ अशोक चव्हाणांच्याचं गळ्यात राहणार असल्याचे बोलले जात आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला, राज्यात कॉंग्रेसला केवळ एकच जागा मिळाली, विशेष म्हणजे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही नांदेड लोकसभा मतदार संघातून पराभव झाला. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. परंतु काँग्रेस हाय कमांडने चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पक्षातील कोणताही नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेस हाय कमांडने चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे बोलेले जात आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे दिसत आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामही सुरु केले आहे. लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पराभाव्व स्वीकारावा लागूनये यासाठी अशोक चव्हाण जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे.