मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. सध्या शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष कोणत्या अटींवर सहमत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज बंडखोर आमदारांची बैठक घेतल्याची देखील चर्चा आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ही बैठक झाली.
पहिला आणि मोठा प्रश्न एकनाथ शिंदे स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद मागणार का? त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार यावर जोरदाक चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तर शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोर आमदारांसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.
शिंदे गटाकडे विद्यमान सरकारचे 8 मंत्री आहेत. अशा परिस्थितीत या आमदारांना जे मंत्रिपद आधीपासून होते तेच मंत्रीपद शिंदे गटाला हवे आहे. कारण गेल्या महिनाभरात घेतलेले त्यांचे महत्त्वाचे निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रोखले आहेत. कालच या मंत्र्यांकडून मंत्रीपदे हिसकावून इतर आमदारांकडे सोपवण्यात आली आहेत.
शिंदे गटात एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येडरावकर, बच्चू कडू (प्रहार) यांना मंत्री बनवल्या जाऊ शकते. तसेच यामध्ये नवीन दीपक केसरकर, प्रकाश आबिडकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाठ यांच्या नावाचा देखील विचार केला जात असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<